लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी सुरू

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रांची तपासणी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली असून त्याची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघांनुसार मतदान यंत्रांचे वितरण केले जाणार आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदार संघांनुसार मतदान यंत्रांचे वितरण केले जाणार आहे.

मतदान यंत्रे चांगल्या व चालू स्थितीत आहेत की नाहीत, त्याची तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा साधने, व्हिडिओ चित्रीकरण कॅमेऱ्यांची तपासणी केली जाईल.

उमेदवारांची यादी असलेले यंत्र (बीयू म्हणजे बॅलेट युनिट), मतदार केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण यंत्र (सीयू म्हणजे कंट्रोल युनिट) आणि मतदार सत्यता पडताळणी यंत्र (व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरियबल पेपर ऑडिट ट्रायल) यांचीही तपासणी केली जात आहे. मतदानापूर्वी विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानयंत्रे पाठविली जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)