हिंदीमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

पुणे – भारत सरकारच्या राजभाषा विभागाद्वारे टिपण आणि आलेखन संदर्भात 20 हजार शब्दांच्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुणे मंडलच्या 90 कर्मचाऱ्यांचा मंडल रेल्वे प्रबंधकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मंडल राजभाषा कार्यान्वयन समिती’ची 82 वी बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक मंडल रेल्वे प्रबंधकांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंडल कार्यालयाचे वरिष्ठ शाखा अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

-Ads-

हिंदी भाषेमध्ये काम करणे ही आपली जबाबदारी आहे. यासंबंधी आपल्याला राजभाषे संबंधी नियम आणि अधिनियमांची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर त्याचे पालन करणे आवश्‍यक आहे,’ असे यावेळी मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)