महिलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धेत स्नेहा रामदासी प्रथम

पिंपरी – भैरवनाथ क्रीडा संकुलच्या वतीने महिलांसाठी सुर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये स्नेहा रामदासी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर एकूण 25 महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रीय खेळाडू सलोनी जाधव या पंच म्हणून उपस्थित होत्या.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण लिशा पाटील व रोहिणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत स्नेहा रामदासी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय किरण गौर, तृतीय चैत्रा रेवतगाव, उत्तेजनार्थ रश्‍मी पाठक, कविता मदाने, खुशी गुरी, मृणाल माळी, अशा गायकवाड, ऋतुजा माळी यांनी परितोषीक पटकावले. विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा छाया मोहिते यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)