निसर्ग संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यस्तरीय शिबिर

आकुर्डी – राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय कक्ष महाराष्ट्र शासन मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने राज्यस्तरीय स्वच्छ भारत अभियानातून निसर्ग संवर्धन शिबिर घेण्यात आले.

अकोले तालुक्‍यातील रतनगड मधील कळसुबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्य येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. हरिश्‍चंद्रगड येथे भाविक मोठ्या संख्येने अमृतेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच रतनगड, कळसुबाई व सांदणदरी हे पर्यटन स्थळ असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. प्रदूषण वाढत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रदूषणाबाबत जनजागृती केली.
अमृतेश्‍वर मंदिर परिसर, रतनवाडी गाव तसेच रतनगड याची साफसफाई केली व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली.

गावातील लोकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाबद्दल जनजागृती केली.रतनगड सर करताना विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. डी. आर. शिर्के तसेच प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी दिली. विद्यार्थ्यांना देवराई ही संकल्पना समजावून सांगून त्याचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वक्‍त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या शिबिराच्या समारोप प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे, ते करणे आपले कर्तव्य आहे. आपण आपली संस्कृती अभ्यासली पाहिजे व ती जाणून घेतली पाहिजे. तसेच संस्कृतीचे संवर्धन करून विद्यार्थ्यांनी इतिहास लिहिणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले.

डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विश्‍वस्त डॉ. स्मिता जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, डॉ. रणजित पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश फुंदे, डॉ. मीनल भोसले, प्रा. खालिद शेख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी, प्रा. सतीश ठाकर यांनी संयोजन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)