जाचाला कंटाळून पतीची हत्या

पिंपरी – दारू पिऊन नेहमी मारहाण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली. याप्रकऱणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

रणविजय कुमार साह (वय-29, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राणी गजानन निषाद (वय-24, रा. पांढरे वस्ती, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तर गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय-28) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी हे मूळचे छत्तीसगड येथील असून कामाच्या शोधत ते पुण्यात आले होते. पांढरे वस्ती, पुनावळे येथील कैलास हिंदुजा यांच्या जागेत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. पती वारंवार दारू पिऊन आरोपी पत्नीला मारहाण करीत असे. यावेळी पतीनेच पत्नीला मारण्यासाठी दगड आणला होता, मात्र त्यांच्यात झालेल्या वादात तो दगड पत्नीकडून पतीला लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)