महिलेला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी -दारु पिऊन महिलेला मारहाण करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांवरही भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकऱणी 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून शंकर चलवारे व शालन चलावारे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कपडे धुत असताना शंकर हा मद्यधुंद अवस्थेत तेथून जात होता. यावेळी त्याने फिर्यादी यांना झाडू फेकून मारला, याचा फिर्यादी यांनी जाब विचारला असता शंकर व शालन यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी दोघांवरही मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. भोसरी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)