“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’

पिंपरी – पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिक संतप्त आणि दुःखी आहेत. 42 जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यावा, यासाठी नागरीक सोशल मीडियावर सातत्याने सरकारला आवाहन करत आहेत. केवळ आवाहनच नव्हे तर काही तरुणांनी यासाठी निधी जमा व्हावा म्हणून जनजागृती देखील सुरू केली आहे. शहरातून मोठ्या संख्येने नॅशनल रिलीफ फंडात मदत जमा करणाऱ्या तरुणांनी दैनिक “प्रभात’च्या माध्यमातून सर्वांनी नॅशनल रिलीफ फंडात मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या गणेश बोरा यांनी आर्थिक मदत करुन यासाठी इतरांनाही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यावर सकारात्मक प्रतिक्रियासह काही तासातच मोठ्या संख्येने निधी जमा व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकजण निधी जमा केल्यानंतरचा स्क्रीन शॉट ग्रुपवर शेयर करत होते. “मोदीजी आम्हाला काही नको, मात्र बदला घ्या, आम्ही निधी पुरुवू’ अशा पोस्ट देखील या स्क्रीन शॉटसोबत फिरु लागल्या.

“भारतीय जवानांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला झाल्यावर मन सुन्न झाले होते. देशासाठी जवान आपले प्राण गमावतात तर आपण त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत करायला हवी, अशी कल्पना मनात आली. कुठे आणि कशी मदत करायची याची माहिती काढली आणि मदत जमा केली. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरवण्यास सुरुवात केली. हळू-हळू कित्येक तरुण या अभियानात जोडले गेले आणि त्यांनीही प्रचार सुरू केला.
– गणेश बोरा, स्थानिक तरुण युवक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)