बस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण

पिंपरी -अंध विद्यार्थ्याकडे तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने चिडलेल्या पीएमपीएमएल बस वाहकाने अंध विद्यार्थ्याला मारहाण व शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी चिंचवडगाव येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग रामचंद्र खरसळे (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) या विद्यार्थ्याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद मालुसरे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग हे अंध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेतात. ते चिंचवडगाव येथे आले होते. आरोपी वाहकाने पांडुरंग यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितले.वाहकाने सुट्ट्या पैशांची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याचे पांडुरंग यांनी सांगितले असता वाहकाने फिर्यादी यांचे खिसे तपासले. चिडून वाहकाने शिवीगाळ करत आणि पांडुरंग यांच्या कानशिलात चापट मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)