35 हजारांचे ऍल्युमिनिअम चोरीला

पिंपरी – कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनीतून 35 हजार रुपये किमतीचे ऍल्युमिनिअम बार चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) पहाटे चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली. धनंजय रामचंद्र शिराळकर (वय-52, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे ऍल्युमिनिअम बारच्या स्टोअरमध्ये नोकरी करतात. शुक्रवारी रात्री कंपनी बंद केल्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास चार इसमांनी कंपनीच्या स्टोअरचे गज कापून कंपनी परिसरात प्रवेश केला. त्यानंतर 35 हजार रुपये किमतीचे ऍल्युमिनिअम बार चोरून नेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)