सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

File photo

पिंपरी – शहरातील नेहरुनगर, उद्यमनगर, विठ्ठलनगर व यशवंतनगर परिसरात सातत्याने होत असलेल्या चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला संघटिका सुरेखा हुले यांनी महापालिका आयुक्‍तश्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

नेहरुनगर परिसरात मागच्या कित्येक दिवसापासून रात्रीच्या वेळी चोर कामगार वर्गाला त्रास देत असून कामावरुन परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पैशांची लूट करण्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी अनेकदा मनपा अधिकाऱ्यांकडे करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावी अशी मागणी सुरेखा हुले यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)