दुकानदाराला कोयत्याने मारहाण

पिंपरी -किराणा दुकानदार दुकान बंद करून घरी जात असताना त्याला अडवून तीन जणांनी मारहाण केली. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास मारुंजी येथील कॅनलजवळ घडली. मयूर अर्जुन बेडकुते (वय-19, रा. पाटीलवस्ती, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार राज भरत लोखंडे आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर यांचे मारुंजी येथे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मयूर दुकान बंद करून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. ते मारुंजी येथील कॅनलजवळ आले असता मयूर यांच्या दुचाकीला आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपी राज याने मयूर यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्‍याच्या मागील भागावर वार करुन जखमी केले. तसेच आरोपीच्या दोन साथीदारांनी मयूर यांना हाताने मारहाण केली. आरोपींनी मयूर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)