रामकृष्ण मोरे महाविद्यालयातर्फे ‘हिंदी कविता’वर राष्ट्रीय चर्चासत्र

पिंपरी – आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंदी कविता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभागाचे विभाग प्रमुख आणि हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. सदानंद भोसले यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. चर्चासत्रात प्रेमलता चुट्टेल, लता चव्हाण, डॉ. गेलजी भाटिया, डॉ. रणजीत भारती आदी सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. सदानंद भोसले यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी देशात हिंदी भाषेचे असलेले महत्त्व पटवून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. प्रेमलता चुट्टेल यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. लातूर येथील डॉ. अंबादास देशमुख लातूर यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभ संपन्न झाला. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. पी. मिश्रा यांनी केले. डॉ. मधुकर राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)