सलग दहा तास सायकलिंगचा शाश्‍वतने केला विश्‍व विक्रम

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या मुलाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्वविक्रम केला आहे. बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी सहा वाजता शाश्वत याने सायकल चालवायला सुरुवात करुन सायंकाळी चार वाजता विश्वविक्रम पूर्ण केला.

शाश्‍वत याने विक्रम पूर्ण केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर योगेश बहल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’चे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आनंद भावसार, विजय तुंगार, अमोल ताकवडे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी, आकाश सेंगर, कुणाल मोहोळ, श्रीपाद कुलकर्णी, जालिंदर भोर, अच्युतराव सालके-पाटील, ऍड. सुभाष देशमुख, भिवसेन तळेकर, खंडू शिंदे, रंगनाथ गावडे, राजू भापकर आदी उपस्थित होते. शाश्वत याचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्‌ अध्यक्ष डॉ. दिवाकर सुकूल, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य वीरेंद्र शर्मा आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’चे प्रमुख ऍड. संतोष शुक्‍ला यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)