नवनगर विकास मंडळातर्फे आयोजित शिबिरात 98 जणांनी केले रक्‍तदान

दिघी- दिघी येथील नगरसेवक विकास डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली नवनगर विकास मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले होते. दिघी, गायकवाड नगर येथील होराईझन स्कूलमध्ये आयोजित या शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या रुग्णांना असलेली गरज आणि त्या तुलनेत होत असलेली रक्‍ताची उपलब्धता पाहता रक्‍तदान शिबिरांच्या आयोजनांची मोठी गरज आहे. एका व्यक्‍तिने केलेले रक्‍तदान चार जणांचे प्राण वाचवू शकते. हीच गरज लक्षात घेत नगरसेवक विकास डोळस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्‍तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील यावेळी उपस्थित होते. आमदार लांडगे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले आणि अशा प्रकारचे आयोजन सातत्याने करत रहावे, असे प्रोत्साहन दिले. तसेच यावेळी त्यांनी नगरसेवक डोळस आणि नवविकास मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे देखील कौतुक केल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी आमदार महेश लांडगे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, कुलदीप परांडे, उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनामध्ये रुबी हॉल क्‍लिनिकने देखील सहकार्य केले. शिबिराच्या आयोजनात आकाश खरात, सिद्धार्थ गायकवाड, राज दास, सुशांत पवार, अमोल घोडेकर, रोहन सारसर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)