दुकानदाराला तराजूने मारहाण

पिंपरी – किराणा दुकानदाराला चौघांनी दुकानात जाऊन दुकानातील लोखंडी तराजूने मारहाण केल्याचा प्रकार भोसरी येथील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत धोंडोप्पा गोळ हे जखमी झाले असून त्यांची पत्नी मल्लम्मा गोळ यांनी भोसरी एमआयीडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावेद (वय-25, संपुर्ण नाव माहिती नाही) त्याचे आजोबा, चुलते व जावेदच्या आत्याचा नवरा (सर्व रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळ हे 21 जानेवारी रोजी त्यांच्या दुकानात असताना आरोपी संगनमत करुन त्यांच्या दुकानात घुसले. त्यांना शिवीगाळ केली. तसेच दुकानातील लोखंडी तराजूने मारहाण केली. यामध्ये गोळ यांच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली आहे. उपचार झाल्यानंतर गोळ यांनी मंगळवारी (दि. 29) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)