मूल्यांकनापासून वंचित शाळा आणि तुकड्यांच्या ‘ऑफलाइन’ला हिरवा कंदील..!

आमदार दत्तात्रय सावंत यांची माहिती : मावळातील शिक्षकांना मार्गदर्शन

कनिष्ठ महाविद्यालयाची अट शिथील…

प्राथमिक व माध्यमिक शाळा व तुकड्यांप्रमाणे ज्युनियर कॉलेजच्या शासन निर्णयामधील (दि. 26 फेब्रुवारी 2014) दोन क्रमांकाची अट मूल्यांकन करते वेळी कमीत कमी पाच वर्षे झालेली असावीत. ही अट शिथिल करून अनुदान देते वेळी चार वर्षे पूर्ण असावीत ही मागणीही शिक्षण मंत्र्यांनी मान्य केली आहे. तसे परिपत्रक निर्गमित होईल, अशी माहिती आमदार सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

नाणे मावळ – राज्यातील मूल्यांकनापासून वंचित शाळा व तुकड्यांचे ऑफलाइन प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात लवकर परिपत्रक काढण्यात येईल, त्यामुळे सर्वांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी कामशेत येथे दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे यांनी भेट घेऊन शैक्षणिक प्रश्‍नांविषयी चर्चा केली. मुंबईतील बैठकीसंदर्भात मावळातील शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे मावळचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक शंकरराव धावणे, अशोक वाडेकर, दीपक गालफाडे, अमोल कराड, उत्तम माने आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मावळातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव व पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी मावळ तालुक्‍यातील तुळजाभवानी विद्यालय (सोमाटणे), ग्राम प्रबोधिनी विद्यालय (साळुंब्रे), पंचक्रोशी विद्यालय (दारुंब्रे), न्यू इंग्लिश स्कूल (चांदखेड) आणि न्यू इंग्लिश स्कूल (वडगाव) येथील विद्यालयांना सदिच्छा भेट दिली.
तसेच नाणे मावळातील गोल्डन ग्लेड्‌स माध्यमिक विद्यालय (करंजगाव) व नाणे माध्यमिक विद्यालय (नाणे) या शाळेतील शिक्षकांची भेट घेवून मार्गदर्शन केले

याशिवाय शिक्षकांच्या डीसीपीएस, जुनी पेन्शन योजना, मेडिकल बीले, वैयक्‍तिक मान्यता, शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती आदी समस्या जाणून घेतल्या. या समस्यांबाबतची शासन स्तरावरची सद्यस्थितीविषयी सविस्तर
माहिती दिली.

“गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या असंख्य शिक्षकांचे प्रश्‍न पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कार्यक्षम नेतृत्त्वामुळे सुटणार आहे. 2012-13 च्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचा मूल्यांकनाविषयीचा प्रश्‍न लावून प्रस्ताव सादर करण्यासाठी शिक्षकांना सूचना करण्यापर्यंत यश आलेले आहे. याचा पाठपुरावा करुन लवकरात अनुदान सुरू करण्यात यावे, हीच अपेक्षा आहे.                                                                                               – अशोक वाडेकर, संघटनमंत्री, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, मावळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)