अभियांत्रिकी महाविद्यालय करतेय मेट्रोचे स्ट्रक्‍चरल ऑडिट

महामेट्रोचा खुलासा : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली होती मागणी

पिंपरी – शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची जबाबदारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती महामेट्रोने राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका पत्राद्वारे दिली आहे. दि. 5 जानेवारी रोजी नाशिक फाटा येथे झालेल्या एका मोठ्या अपघातानंतर स्ट्रक्‍चरल ऑडिटचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. या अपघाताची चौकशी व मेट्रोचे “सेफ्टी स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महामेट्रोकडे 8 जानेवारीला केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये नाशिक फाटा येथे 5 जानेवारी रोजी पाइलिंग रिग मशिन कोसळून अपघात झाला होता. याबाबत महामेट्रोने लेखी खुलाशाव्दारे कळविले आहे की, मेट्रोच्या कामाची गुणवत्ता व सुरक्षा याची तपासणी फ्रान्स मधील “ब्युरो वेरिटास’ या कंपनीकडून केली जाते. तसेच पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्‍ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचे काम सुरक्षितपणे प्रगती पथावर असून पुढील काळात कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे पुणे मेट्रोचे प्रकल्प कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी कळविले आहे.

सुरक्षेसाठीचे उपाय

5 जानेवारी रोजी झालेल्या अपघाताची चौकशी महामेट्रोने पूर्ण केली असून दोन अभियंते व रिंग ऑपरेटर यांना निलंबित केले आहे. तसेच पाईल काम करणा-या कंपनीस पाच लाख रुपयांचा दंड महामेट्रोने केला आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहे. मशीन ऑपरेटरला ठराविक कालावधीने प्रशिक्षण देणे, सर्व चालकांची वैद्यकीय तपासणी दर सहा महिन्यांनी वैद्यकीय अधिका-यामार्फत करणे, दररोज काम सुरु करण्यापुर्वी मशीन योग्य व सुरक्षित असल्याची खात्री करणे, तसेच सुरक्षिततेबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांमार्फत माहिती व प्रशिक्षण
देण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)