पथारीवाल्यांचे पुनर्वसन बाजार समितीच्या जागेत

तळेगाव दाभाडे : अतिक्रमण कारवाई झालेल्या भाजी विक्रेत्यांसाठी पुनर्वसन करण्यासाठी कामाचे भूमिपूजन करताना आमदार बाळा भेगडे व मान्यवर.

आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

तळेगाव दाभाडे – येथील हद्दीतील टपरी, हॉटेल, दुकाने व घरांवर नगरपरिषदेच्या वतीने केलेल्या अतिक्रमण कारवाईची दखल कारवाई ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी गवत बाजाराजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत त्यांना दुकाने उपलब्ध करून देण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.15) करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तळेगाव दाभाडे स्टेशन परिसर, तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्गालगत, भाजी मंडई तसेच पैसाफंड कांचा कारखान्याजवळील टपरी, हॉटेल, दुकाने व घरांवर नगरपरिषदेच्या वतीने मागील महिन्यांपासून करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईची दखल आमदार बाळा भेगडे यांनी घेतली. पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून ज्या भाजी विक्रेत्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून देणे बाबतचा निर्णय घेतला.

सन 1998 मध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथराव भेगडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती असताना त्यांनी सहा एकर जागा गवत बाजार तळेगाव स्टेशन येथे भाजी मंडई, सुलभ शौचालय या करिता आरक्षित केली होती. त्या जागेवर मंडई मधील सर्व व्यावसायिकांना 15 बाय 15 चे गाळे काढून देण्यात येणार आहेत.

भाजी मंडई, फळे व अन्य विक्रेते यांची विभागवार सोय करण्यात येणार आहे, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने या कामाकरिता लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील हे सर्वोत्तम भाजी मार्केट होणार असून, या मार्केटला छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या नावाने संबोधले जाणार आहे. मार्केटला जोडणारे रस्ते हे रुंद व चांगल्या प्रकारचे केले जातील. सर्व व्यावसायिकांचा माल त्यांच्या दुकानापर्यंत पोहचण्यास अडथला येणार नाही. या कामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी भाजी विक्रेत्यांना सांगितले.

या वेळी माजी नगराध्यक्ष रंजना भोसले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश खांडगे, उद्योजक किशोर आवारे, मुख्याधिकारी वैभव आवारे तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका त्याचप्रमाणे मंडई मधील भाजी विक्रेते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)