पवना धरणग्रस्तांच्या व्यवसायावर प्रशासनाकडून आडकाठी

वेळप्रसंगी कठोर पाऊल उचलू : आढावा बैठकीत मुकूंदराज काऊर यांचा इशारा

पवनानगर – पवना धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या व्यवसायाला शासकीय यंत्रणेकडून जाणिवपूर्वक त्रास दिला जात आहे. आमच्या उपजिवेकेचे साधन बनलेल्या व्यवसाय बंद करून देणार नाही, प्रसंगी कोणतेही पाऊल उचलू असा इशारा पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकूंदराज काऊर यांनी बुधवारी (दि. 19) पवनानगर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिला
पवना धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने कायम दिशाभूल करून अनेक वर्षे हा प्रश्‍न रेंगाळत ठेवल्याने आज अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत याचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे, आम्ही सातत्याने पाठपुरावा करुन देखील चालढकल सुरू आहे. आता पुनर्वसन होईपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने आवश्‍यक नसताना संपादन केलेल्या जागेवर स्थानिक धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या पर्यटन केंद्र बंद करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत चढाओढ करणार नाही, पुनर्वसन होईपर्यंत याठिकाणी व्यावसाय सुरुच राहतील. उलट यासाठी परवानगी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या धरणग्रस्त खातेदारांना पैकी 865 खातेदारांना खऱ्या अर्थाने अन्याय झाला आहे, याची दखल शासनाने घेतली पाहिजे.

पवना धरणासाठी 1963 साली जमीन संपादन करण्यात आली. यात 1203 खातेदार बाधित झाले. यापैकी 340 खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन केले; परंतु उर्वरित खातेदारांना अद्याप मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही. यामुळे पवना धरणग्रस्त खातेदारांनी सन 2013 मध्ये न्यायालयात धाव घेतली.

याबाबत याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर सुनावणी सुरू आहे, असे असताना तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांनी मागील आठवड्यात काही कृषी पर्यटन केंद्रात जाऊन पंचनामा केला असून, या जागेबाबत न्यायालयाने “जैसे थे’ परिस्थिती असताना याठिकाणी येऊन केलेला पंचनामा हा नियमबाह्य असल्याचे तरुणांनी सांगितले.

या वेळी पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, कार्याध्यक्ष दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, बबनराव कालेकर, पुणे जिल्हा पर्यावरण समिती सदस्य सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, अनंता घरदाळे, रमेश कालेकर, रवी ठाकर यांच्यासह तरुण यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)