‘त्या’ जमिनी मूळ मालकांना परत द्या!

पवनानगर : उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांना मागण्यांचे निवेदन देताना धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन: पवना धरणग्रस्त समितीची मागणी

पवनानगर – पवना धरणगस्तांनी आमचे पुनर्वसन करुन नोकरी द्यावी, 1995 च्या आदेशाने संपादन केलेल्या जमिनीपैकी 328 एकर जमीन मूळ मालकांना परत करण्यात आल्या, त्याच धर्तीवरच अतिरिक्त संपादन केलेल्या जमिनी मूळ मालकांना द्यावी, अशी मागणी पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवना धरण परिसरात कृषी पर्यटन केंद्र चालकांनी आज मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांना निवेदनाद्वारे केली. याबाबत, शासनानी आमची दखल लवकरत-लवकर न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, माजी सरपंच अनंता घरदाळे, बबन कालेकर, शंकर घरदाळे, सुधीर घरदाळे, उपसरपंच अनंता वर्वे, रवी ठाकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

काऊर म्हणाले की, धरणग्रस्तांचे उर्वरित खातेदांराचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. या ठिकाणी मुळ मालकांच्या अतिरिक्त संपादन जागेत मुळ मालकांचे वारस उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीपुरक व्यावसाय म्हणुन कृषी पर्यटनांच्या माध्यमातुन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना एक दिवस जेवण व राहण्याची व्यवस्था करत असल्याने पर्यटन व्यावसायामुळे स्थांनिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु, मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणच्या कृषी केंद्रावर जाऊन महसुल विभागाने पंचनामे केले असून याला तीव्र विरोध आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)