मावळ : माजी सरपंचावर अपहाराचा गुन्हा दाखल

वडगाव मावळ – चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये घराला व झाड नामफलक लावण्याच्या कामात भ्रष्टाचार करून अपहार केल्याप्रकरणी चिखलसेच्या तत्कालीन सरपंचावर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये बुधवार (दि.23) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

बबन लक्ष्मण चौधरी (रा. चिखलसे ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन सरपंचाचे नाव आहे.
तत्कालीन ग्रामसेविकेने मंगळवार (दि.22) रोजी एक दिवस अगोदर अपहारातील रक्कम 18,375 रुपये भरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे टळले. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पुताजी काजळे यांच्या तक्रारीची दखल घेत मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी चौकशी करून शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी विस्ताराधिकारी बाळासाहेब दरवडे यांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये घराला व झाडा नामफलक लावण्याचे कामात भ्रष्टाचार केल्या प्रकरणी मावळ पंचायत समिती, पुणे जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार केली. त्या तक्रारीची वरिष्ठांनी दखल घेऊन सदर तत्कालीन सरपंच चौधरी व ग्रामसेविका राऊत यांची चौकशी करण्याचे आदेश मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना दिले.

पंचायत समितीचे विस्ताराधिकारी बाळासाहेब दरवडे यांनी ग्रामपंचायत दप्तर तपासणी केली असता, घराला व झाडाला नामफलक लावण्याच्या कामात 36,750 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच चौधरी यांच्या कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक महेंद्र वाळुंजकर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)