मावळ : बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी तोडगा काढू

उर्से : येथे बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करताना आमदार बाळा भेगडे.

आमदार भेगडे यांचे उर्से येथील बैठकीत आश्‍वासन

सोमाटणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पासाठी शासनाने संपादित केल्या आहेत तसेच भविष्यातही शासन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी हडप करण्याच्या मार्गावर आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी शेतकऱ्यांना विचारात न घेता उर्सेपर्यंत अनधिकृतपणे मोजणी करण्यात आली होती; परंतु शेतकऱ्यांनी विरोध करून मोजणी बंद पाडली. या सर्व घडामोडीनंतर देखील शासन विविध विकास कामांच्या नावाखाली मावळातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने येथील शेतकऱ्यांनी एक इंच देखील जमीन यापुढे सरकारला देणार नसल्याचा आक्रमक पवित्र घेतला.

या संदर्भात निवेदन पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रस्ते विकास महामंडळ यांना देण्यात आले. याची दाखल घेत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी तत्काळ शेतकऱ्यांची बैठक उर्से येथे बोलावून बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी नवीन होणाऱ्या हयापारलूप, बंदिस्त जलवाहिनी, सेवा रस्ता यासह नवीन प्रकल्पांविषयी आपले म्हणणे मांडले.

नव्याने संपदीय करण्यात येणाऱ्या जमिनीमुळे शेतकऱ्यांसाठी कसण्यासाठी काहीच जमीन राहणार नाही. शेतकऱ्यांचा कसा तोटा होणार आहे. याविषयीचे मत बाधित शेतकरी रवींद्र गोपाळे, रामदास ओझरकर, गुलाब धामणकर, सुभाष धामणकर आदींनी मांडले.

यावर भेगडे म्हणाले की, लवकरच पीएमआरडीएचे अधिकारी व शेतकरी यांची लवकरच बैठक बोलावून व शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच यावर निश्‍चितपणे तोडगा काढला जाईल.

उर्से येथील बैठकीला भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, शेतकरी हक्‍क कृती समिती अध्यक्ष सुभाष धामणकर, नवनाथ मुऱ्हे, उत्तम पोटावडे, चंद्रकांत धामणकर, पांडुरंग धामणकर, गुलाब धामणकर, नागेश ठाकूर, सुलतान मुलांनी, दिगंबर राउत, पोलीस पाटील गुलाब आंबेकर, बंडोपंत धामणकर, गोमाशेठ धामणकर आदीसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)