टाकवे इंद्रायणी पुलावर मोठी दुर्घटना टळली

टाकवे - पुलाच्या कठड्यावर अडकलेली जीप.

टाकवे – कान्हे जवळील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या सुरक्षारक्षक रिलिंगला रविवारी पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास एका खासगी वाहतूक करणाऱ्या जीपची धडक दिली. या जीपचा अचानक “ब्रेक फेल’ झाल्याने धडक बसल्याचे चालकाकडुन सांगण्यात आले आहे. सुदैवाने या गाडीत प्रवासी बसलेले नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी याच पुलाला एका भरधाव ट्रकने धडक दिली होती. इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटना वारंवार वाढ होत असल्याने नवीन पुलाचा प्रश्‍न पुन्हा उपस्थित केला जात आहे. पुलाच्या निधी संदर्भातील माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली असता पुलासाठी कोणताही निधी अद्याप मंजूर नसल्याची माहिती समोर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदर मावळ सर्वच लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थानी पुलाविषयी अनेक वेळा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु अद्याप त्यांना यश मिळाले नाही; तुर्तास तरी आशा अपघातांची पुनावृत्ती टाळण्यासाठी वाहचालकांनी पुलावरून जाताना आपले वाहन नियंत्रणात राहिल अशी गती ठेवणेच लाभदायक ठरणार आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत विविध मागण्या करण्यात आल्या असून, यामध्ये पुलाच्या सुरक्षारक्षक रिलिंगची उंची वाढवावी.

तसेच पुलाच्या वरती रात्रीच्या वेळी प्रकाश राहावा, यासाठी पथदिवे बसवावे, अशी मागणी सार्वजनिक विभागाला करणार असल्याची माहिती रोहिदास असवले, काळुराम घोजगे, गुलाब जांभुळकर, चंद्रकांत असवले, तानाजी मोरे, ज्ञानेश्‍वर ढोरे, किरण भांगरे, निलेश जगताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)