मावळ : कार्ल्यात दीपोत्सवाने इतिहासाला उजाळा

स्मरण : इंग्रज-मराठ्यांच्या लढाईला ऐतिहासिक किनार

कार्ला – हिंदू समिती लोणावळा यांच्या वतीने इंग्रज आणि मराठे यांच्यातील ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार असलेल्या कार्ला येथील तळ्यात दीप सोडून दीपोत्सव साजरा केला. 4 जानेवारी 1779 रोजी इंग्रज आणि मराठ्यांची लढाई ऐतिहासिक तळ्याकाठी होऊन या लढाईत इंग्रजांचा सेनापती स्टुअर्ट फाक्‍कडा मारला गेला. या लढाईनंतरच मराठे सैनिकांनी विजयाच्या दिशेने वाटचाल करीत वडगाव, तळेगावकडे आगेकूच केली. या विजयी उत्सावाचे प्रतीक म्हणून कार्ला ऐतिहासिक तळ्याकाठी दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाऊसाहेब हुलावळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा दिली. त्यानंतर या विजयाचे प्रतीक म्हणून उपस्थितांनी सर्व दिवे ऐतिहासिक तळ्यात सोडून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सभापती शरदराव हुलावळे, सागर हुलावळे, सुनील गायकवाड, उल्हास पाळेकर, मराठ्यांची गौरवगाथा नाट्याचे निर्माते प्रवीण देशमुख, अनिकेत म्हाळसकर, बोरगावकर, बापु पाटील, सचिन तारे, कैलास बोरकर, संतोष तळपे, “एमटीडीसी’चे व्यवस्थापक  रोहिदास शिर्के, अनिल हुलावळे, बाबाजी सोंडेकर, गणेश हुलावळे यांच्यासह कार्ला ग्रामस्थ व लोणावळा व मावळ भागातील हिंदू समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भाऊसाहेब हुलावळे, गणेश हुलावळे, हिंदू समिती लोणावळा यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)