शहर व मावळ परिसरात क्रांतिज्योतींना अभिवादन

भाजे : बालिका दिन साजरा करताना जागृती महिला मंचाच्या सदस्या.

पिंपरी/मावळ  – ज्यांच्यामुळे देशातील लाखो मुुली व महिला यांनी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त केले, कित्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्त्वाची ध्वजा फडकवली, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात व मावळ तालुक्‍यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडगाव मावळ- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीने महिलांची उन्नती झाली आहे. महिलांना उच्च शिक्षित करुन त्यांना समान संधी उपलब्ध करुन दिल्यास देश महासत्ता होईल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर यांनी केले. येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी नाटिका सादर केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर होते. याप्रसंगी प्रा. महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, प्रा. शीतल शिंदे, डॉ. सुधीर ढोरे, प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा. गजानन वडूरकर, प्रा. संतोष शिंदे, प्रा. योगेश जाधव, प्रा.अतुल जाधव, प्रा. सुखदेव जाधव व बहुसंख विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. महादेव वाघमारे व विद्यार्थी काजल सांगळे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पडर, सूत्रसंचालन विक्रांत शेळके यांनी केले तर आभार डॉ. सुधीर ढोरे यांनी व्यक्‍त केले.

आदर्श समाज विकास संघ

भोसरी- आदर्श समाज विकास संघ यांच्या इंद्रायणीनगर येथील धम्म निनाद बुद्धविहार याठिकाणी महिला आघाडीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना अनुराधा काटे म्हणाल्या की, आजची माहिला विविध क्षेत्रात कार्यरत आहे याचे श्रेय सावित्रीबाई यांच्या कार्याला आहे. त्यांच्या मुळेच स्त्री मुक्‍त झाली. यावेळी रंजना नरवडे, वंदना निवडुंगे, पंचशीला गायकवाड, सुनंदा कसबे, संगीता खरात, वर्षा अमृत सागर उपस्थित होत्या.

गुप्ता विद्यालयात बालिका दिन

कार्ला- विद्या प्रसारिणी सभेच्या भाजे येथील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रशालेच्या प्राचार्या कल्पना साळुंके यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले व मुलींना गुलाबपुष्प देवून बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मळवली येथील जागृती महिला मंचाच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंचाच्या अध्यक्षा संगिता केदारी तसेच उज्वला आंबूरे , शुभांगी पटेकर, प्रिती नाटक, अश्‍विनी औटी, अनुजा वाघमारे यांनी महिला सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या विषयांवर मुलींना मार्गदर्शन केले. मनोहर भोसले व संतोष तळपे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. प्रतिकूल परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या महान कार्यातून आपण आदर्श व प्रेरणा घ्यावी, असे मत प्राचार्या कल्पना साळुंके यांनी व्यक्‍त केले. पर्यवेक्षक रामदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा अहिरे, वैशाली ढाकणे, स्वप्नाली रत्नपारखी, नेहा ढगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जागृती महिला मंचाच्या सुरेखा जगताप, जयश्री तिकोणे, सुनिता वाल्हेकर, प्रिती शिवेकर, सुनिता शिवेकर, अश्‍विनी दळवी यांच्यासह महिला मंचाच्या सदस्या यावेळी उपपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)