पवना धरणग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पवनानगर :पुनर्वसन लवकर मार्गी लावण्यासाठी पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 24) आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेत निवेदन दिले.

उर्वरित जमिनींची फेरमोजणी लवकरात लवकर करावी

पवनानगर – पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पुनर्वसन लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवना धरणग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे अनेक मुलभूत प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यासाठी शासनाने लवकरात लवकर पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे यासाठी धरण परिसरातील उर्वरित जमिनींची फेरमोजणी करावी, धरणग्रस्तांचे वारसांना नोकऱ्या द्यावा.

तसेच धरणग्रस्तांच्या उपजिवेकेचे साधन बनलेल्या कृषी पर्यटन व्यावसायाला अधिकृतपणे परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन दिले आहे. या वेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले की, शासनाने पवना धरण परिसरातील उर्वरित जमिनींची फेरमोजणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली.

या वेळी पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, उपसभापती शांताराम कदम, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर, उपाध्यक्ष दशरथ शिर्के, बबनराव कालेकर, जिल्हा पर्यावरण समिती सदस्य सचिन मोहिते, सुधीर घरदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)