मावळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसंघटन मजबूत

तळेगाव दाभाडे : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक विजय कोलते यांचा सन्मान करताना बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे यांच्यासह मान्यवर.

निरीक्षक विजय कोलते : लोकसभा, विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी

तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्‍यात गेली 25 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असताना देखील पक्ष संघटना मजबूत आहे. हीच खरी कार्यकर्त्याची ताकद आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक विजय कोलते यांनी व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनरल हॉस्पिटलच्या रिक्रीयशन हॉलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्या बरोबर झालेल्या मेळाव्यात भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्व तयारीसाठी विजय कोलते बोलत होते.

या वेळी राष्ट्रवादी मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी तळेगाव दाभाडे अध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, दीपक हुलावळे, विजय काळोखे, सुनील दाभाडे, ऍड. कृष्णा दाभोळे, जीवन गायकवाड, कैलास गायकवाड, किशोर भेगडे, अरुण माने, आनंद भेगडे, आशिष खांडगे, हेमलता काळोखे, सुनिता काळोखे, वैशाली दाभाडे, सुवर्णा राऊत, नंदकुमार कोतुळकर, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना व निवडणुकांचे नियोजन यावर आपले मत व्यक्‍त केले. यामध्ये अभिमन्यू काळोखे, गोरख जांभूळकर, सुनील कडूसकर, नारायण ठाकर, नंदकुमार कोतुळकर, विजय काळोखे, रवींद्र पोटफोडे, सुरेश चौधरी, दीपक हुलावळे, किशोर भेगडे यांनी आपले विचार मांडले. यावर बबनराव भेगडे यांनी निवडणूक आणि पक्ष संघटना मजबुतीसाठी करावयाची व्यूहरचना उपस्थितांना पटवून सांगितली.

कोलते म्हणाले की, पक्ष विरोधी काम करणारास वाटते मी जर उमेदवाराचे काम नाही केले, तर हा पडेल हा त्याच्या आत्मविश्‍वास संपवण्याचे काम कार्यकर्त्यांनी भविष्यात करायचे आहे. तालुक्‍याचे शहरी आणि ग्रामीण असे चार भाग करावयाचे बूथ कमिट्या स्थापन करावयाच्या, प्रभाग कमिट्या स्थापन करावयाच्या आदी बाबींची चर्चा यावेळी केली. स्वागत बबनराव भेगडे यांनी केले. गणेश काकडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)