दुधिवरे खिंडित आढळले तरुणाचे शिरा वेगळे धड

पवनानगर – लोणावळा-पवनानगर रस्त्यावर दुधिवरे खिंडीजवळ रस्त्यालगतच्या झाडामध्ये एका अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या पुरुषाचे शीर कापून धडावेगळे धड आढळले. तरुणाचे धड एका पोत्यात बांधून टाकलेले असल्याचे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधिवरे खिंडीत धड असलेल्या पुरुषाचे वर्णन अंगात निळा, आकाशी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेला टी शर्ट तसेच काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे. मृतदेह उजव्या पंजावर धारधार शस्त्राने वार केलेले आहेत. मृतदेहाची ओळख पटलेली नसून, पोलीस शोध घेत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी तरुणाचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)