बिरदवडी व महाळुंगे इंगळे रस्त्याचे काम मार्गी

file photo

शरद बुट्टे पाटील : पीएमआरडीएकडून साडेबारा कोटी रुपये मंजूर

महाळुंगे इंगळे – दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या चाकण व परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुणे – नाशिक या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या भाम फाटा, बिरदवडी, आंबेठाण व महाळुंगे इंगळे (ता. खेड) या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण मार्गी लावण्यासाठी पीएमआरडीएने तब्बल 12 कोटी 44 लाख रुपये मंजूर केले, असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी येथे दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाकण भागातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांसह महामार्गावर क्षणाक्षणाला सतत वाहतूककोंडी होत आहे. यावर अतिमहत्त्वाचा ठरणारा भामफाटा ते म्हाळुंगे रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणच्या कामासाठी पीएमआरडीएने एकूण 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा निधी खेड तालुक्‍यातील या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50ला जोडणाऱ्या ग्रामीण मार्ग 11, 58, 20ला छेदतो तर पुढे तो 18 ला जावून मिळत आहे.

हा मार्ग बिरदवडी, आंबेठाण व महाळुंगे इंगळे या प्रमुख तीन गावांना जोडतो आहे. या तिन्ही गावामध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी असल्याने नाशिककडे व तळेगाव-मुंबईकडे जाणाऱ्यांना हा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण होणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार या भागातील जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी हा रस्ता दुरुस्तीची मागणी संबंधित विभागाकडे केली होती.

भाम ते बिरदवडी, आंबेठाण व महाळुंगे इंगळे हा खेड तालुक्‍यातील महत्त्वाचा औद्योगिक व बाजारपेठेला जोडणारा औद्योगिक रस्ता आहे. या सात किलोमीटरच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे, गरजेच्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे, रस्त्याच्या साइड पट्ट्या भरणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर खोदाई करणे, आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी मोऱ्या करणे आदी कामांचा त्यामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आल्याचे शरद बुट्टेपाटील यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, आंबेठाणचे सरपंच दत्तात्रय मांडेकर, खेड पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर, दिलीप वाळके, एकनाथ महाराज पवार, मोहन पवार, भानुदास पवार आदिंसह या भागातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)