साडेआठ तासांत अपहरणकर्त्यांकडून व्यापाऱ्याची सुटका

सुत्रधार ताब्यात :पैशातून अपहरण झाल्याचा संशय

देहुरोड – एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात चार अपहरणकर्त्यांनी देहुरोड मुख्य बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याचे त्यांच्या राहत्या घराजवळून सोमवारी (दि. 24) सकाळी सातच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. अपहरणकर्त्यांचा माग काढत साडेआठ तासांत देहुरोड पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्याची सुटका करीत एकास ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईश्‍वर किशनलाल आगरवाल (वय 52, मेन बाजार पेठ, मातृछाया बिल्डिंग, देहूरोड, पुणे) असे अपहरण होऊन सुटका झालेल्या प्रख्यात व्यापाऱ्याचे नाव आहे. ते देहूरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असून, सामाजिक कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी त्याचा भाऊ सत्यनारायण किशनलाल आगरवाल (रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्‍वर आगरवाल हे त्यांच्या घराजवळच सकाळी सातच्या सुमारास देवपूजा करण्यासाठी मंदिरात चालले असताना एका पाढंऱ्या रंगाच्या मोटारीतून (एम.एच.14 जी.डी. 5709) आलेल्या चालकासह चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, पोलीस नाईक सचिन शेजाळ, सागर शेळके, हेमंत गायकवाड, प्रमोद उगले, सुभाष सावंत, दादा जगताप आदींच्या पथकाने अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. साडेआठ तासांनी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ येथे अपहरणकर्त्यांकडून व्यापाऱ्याची सुटका केली.

अपहरणकर्त्यांचा मुख्य सुत्रधार याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अन्य तिघे फरार झाले आहेत. घटनेची माहीती मिळताच पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपतराव माडगुळकर यांचे पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना आपआपसातील पैशाच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता वर्तविली आहे. अपहरण करणाऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)