भ्रष्टाचाराच्या निषेधार्ध देहुरोडमध्ये भाजपा सरकराचा केला निषेध

देहुरोड – राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळा प्रकरणी आणि भ्रष्टाचारी भाजपा सरकारच्या निषेधार्थ देहुरोड शहर ब्लॉक कॉंग्रेंस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. 28) दुपारी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळी गाव कामगार (तलाठी) यांना निवेदन देण्यात आले.

देहुरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तु यांच्या नेतृत्वात राफेल विमान खरेदीमध्ये भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात भाजप सरकारचा जाहीर निषेध आणि धडक मोर्चा काढण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी कॉंग्रेस नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, दिपक सायसर, गफूर शेख, सुखदेव निकाळजे, बाळू पिंजन, विल्सन पालीवाल, जावेद सिकीलकर, अशोक कुसाळे, गोपाळ राव, गणेश आंबेकर, विजय राठोड, कृष्णा देवकुळे, भूपेंद्र सिंह, महिला उपाध्यक्ष राणी पांडियन, गीता रामनारायण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेत सहभागी झाले होते.

126 राफेल लढाऊ विमानाचे 18 हजार 940 करोड रुपये मूल्याची खरेदी ठरविले असताना 41 हजार 205 करोड रुपये जादा देउन 60 हजार 145 करोड रुपयात फक्‍त 36 विमाने खरेदी करुन घोटाळा, भ्रष्टाचार करणारे म्हणजे देश संरक्षणाकडे दुर्लक्ष करणारे आणि देशाचे हित कमजोर करीत लढाऊ विमान बनविण्याचे अनुभव नसणाऱ्या रिलायन्स डिफेंस कंपनीला ठेका देत ठराविक व्यक्‍तीचे हित पहाणारे भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेद्र मोदी शेतकऱ्याकडे गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करीत जीएसटी, नोटबंदीद्वारे महागाई वाढवित जनतेच्या पैशाची लुटमार करीत आहे.

या सरकारची संयुक्‍त समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करीत आहे. मिझोराम, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील जनतेने जसे सत्ताधारी भाजप सरकारला जागा दाखविली, तशी जागा आता जागृत जनता दाखवून देईल, असे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त करीत भाजप सरकारच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात आले. गावकामगार तलाठी अतुल गीते यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)