घरात घुसून बहिणींचा विनयभंग

पिंपरी – दोन तरुणी घरात एकट्याच असताना एक तरुण जबरदस्तीने घरात शिरला. त्याने दोन्ही तरुणींसोबत अश्‍लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना ओटास्कीम येथे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर जाधव (रा. ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार फिर्यादी तरुणी आणि तिची बहीण दोघीच घरी होत्या. त्याचा गैरफायदा घेत आरोपी त्यांच्या घरात आला. त्याने फिर्यादीचा हात पकडला. दोघी बहिणींशी त्याने अश्‍लील वर्तन केले. झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने दोघींना बघून घेण्याची धमकी दिली. यावरून घाबरलेल्या तरुणीने निगडी पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)