विवाहितेच्या छळ करणाऱ्या पती, सासू, नणंदेवर गुन्हा दाखल

पिंपरी – शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यात पत्नी सक्षम नसल्याचा आरोप करत तिचा छळ करणाऱ्या पतीसह, सासू, नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती योगेश दत्तात्रय मगर याच्यासह सासू , नणंद यांच्यावर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम नाही म्हणत पीडितेला पती व सासूने घटस्फोटाची मागणी केली. तसेच पतीने माहेरून गाडी, चांदीची भांडी व लॅपटॉप घेऊन ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवसें-दिवस तिचा मानसिक व शारिरीक छळ वाढतच चालला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)