पिंपरीत हॉटेल मालकाने ग्राहकाच्या डोक्‍यात फोडली काचेची बाटली

पिंपरी – माझ्या हॉटेलवर परत का आलास म्हणत हॉटेल व्यावसायिकाने रागाच्या भरात युवकाच्या डोक्‍यात शीतपेयाची काचेची बाटली मारली. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

रणजित खलसन पाल (वय-38, रा. साई चौक, पिंपरी) यांनी तक्रार दिली असून जगी गिरीजा (वय-45, रा. पिंपरी) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हे पिंपरी येथील हॉटेल शेहनाई येथे त्यांचा मित्र विश्‍वजीत विश्‍वास यास भेटण्यास गेले असता हॉटेल मालक जगी याने तू काम सोडले आहेस, मग माझ्या हॉटेलमध्ये का आला म्हणत शीतपेयाची काचेची बाटली फिर्यादीच्या डोक्‍यात मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)