पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी – उचलून नेण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुणाल सुनील वेताळ (वय-19, रा. गांधीनगर, पिंपरी), एम.डी. (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एच. ए. शाळेच्या गेटवर थांबली असता आरोपी तिथे आले. त्यांनी “”तू माझ्या मित्राला खूप आवडतेस”, असे म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर मुलीने आरोपींना तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी आपल्या घरी जात होती. त्यावेळी देखील आरोपींनी तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. रस्त्यात अडवून तिचा हात पकडून “”तुझी आमच्या बरोबर बोलायची लायकी नाही. तुझ्यापेक्षा चांगल्या पोरी आम्हाला भेटतील. तू जर नाही म्हणालीस तर तुला उचलून नेईल”, असे म्हणत तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)