घरफोडीत दीड लाख लंपास

पिंपरी – कपडे खरेदी करण्यासाठी कुटुंब घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घरफोडी करत घरातील तब्बल 1 लाख 58 हजारांचा ऐवज चोरला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.

सुधाकर रावसाहेब पवार (वय-48, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी सोबत कपडे खरेदीसाठी गेले असता दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सांगवी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)