जॅमर काढण्यासाठी पोलिसाला धक्‍काबुक्‍की

हिंजवडीतील प्रकार : दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी – वाहनास लावलेला जॅमर काढण्यासाठी दोन जणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणपत पांडुरंग मालपोटे (वय-45) आणि किरण छबन मालपोटे (वय-30, दोघेही रा. कातरखडक, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी अमोल जनार्धन बनसोडे (वय-32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे हे हिंजवडीच्या शिवाजी चौक परिसरामध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळील नो पार्किंग फलकाजवळ आरोपींनी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आपली पिकअप गाडी पार्क केली.

या गाडीला फिर्यादी बनसोडे यांनी जॅमर लावला. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने “”तू गाडीचा जॅमर काढ”, असे एकेरी भाषेत सांगितले. त्यावेळी पोलिसांनी “”तुम्ही चलन पेड केल्यास जामर काढतो”, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने “”तुझा बाप जॅमर काढेल”, असे म्हणत शिवीगाळ करत अंगावर धावून आले. तसेच पोलिसांच्या वर्दीला पकडण्याचा प्रयत्न केला. “”तुला बघून घेतो, तुझी नोकरी घालवतो”, अशी धमकीही आरोपींनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)