अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी – अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला फोनवर दुसऱ्या मित्राशी बोलण्यासाठी जबरदस्ती केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास निगडी परिसरात घडली. नागेश पाटील आणि नवनाथ पांचाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

या प्रकरणी एका 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 13 डिसेंबरपासून पीडित मुलीचा पाठलाग करीत आहेत.

शुक्रवारी रात्री मुलगी घराजवळ असताना आरोपी पांचाळ याने मुलीचा हात धरला. तिला आरोपी पाटील याच्याशी फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती करीत तिच्याशी गैरकृत्य केले. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)