पिंपरी – पॉर्न व्हिडीओ दाखवून पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या वासनांध बापाने आपल्या सात वर्षाच्या चिमुकल्यालाही सोडले नाही. पॉर्न फिल्म दाखवून त्याच्यासोबतही लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पत्नीने आपल्या पती विरोधात तक्रार दिली आहे. तसेच शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी सासू आणि दोन नणंद अशा एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न झाल्यानंतर 2010 सालापासून आरोपी संगनमत करुन सतत मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या दरम्यान महिलेचा पती तिला पोर्न फिल्म दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करीत होता. तसेच तिच्या सात वर्षाच्या मुलालाही पोर्न व्हिडीओ दाखवून त्याच्यासोबत लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.