पैशांसाठी पत्नीचा छळ

पिंपरी – दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीला मारहाण आणि क्रेडिट कार्डचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार संभाजीनगर चिंचवड येथे 2010 ते 15 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला.

देवीदास मारुती मासाळकर (वय-39, रा. संभाजीनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पत्नीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी देवीदास याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे तो पत्नीस मारहाण करीत असे. तसेच दरम्यानच्या कालावधीत आरोपीने क्रेडिट कार्डवर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाच्या परतफेडीसाठी त्याने पत्नीला माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी त्रास देत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)