साडेपाच लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी – तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून पाच लाख 61 हजार 308 रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली. जौजफ महम्मद अन्वारूल हक शेख (वय-27, रा. पेठ क्रमांक 27, निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनुप सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांना 12 सप्टेंबर 2017 रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास “मॉन्स्टर जॉब डॉट कॉम’ या “ऑनलाइन जॉब पोर्टल’वरून नोकरी संदर्भात मेल आला.

त्यानंतर आरोपी अनुप सिंग याच्या सांगण्यानुसार वेळोवेळी पाच लाख 61 हजार 308 रुपये “ऑनलाइन ट्रान्स्फर’ केले. त्यानंतर आरोपीने नोकरी न देता तसेच फोन बंद करून फसवणूक केली. उपनिरीक्षक रघुनंदन भोये याबाबत अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)