महापालिकेच्या तिजोरीत 435 कोटींचा महसूल; लक्ष्य 525 कोटींचे

उरले केवळ पाच दिवस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागारात मंगळपरी दि.26 मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या भरण्यातून 435 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असून महापालिकेने जप्तीची कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, महापालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे आणि ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे.
संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर म्हणाले, “कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 525 कोटी रुपयांचे उदिष्ट होते.

आजपर्यंत मालमत्ता करातून 435 कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपायला केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. महापालिकेने जप्तीची कारवाई तीव्र केली आहे. कराचा भरणा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरु राहणार आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी. महापालिका कारवाईची मोहीम तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)