चिंचवडमध्ये घरफोडी; 54 हजारांचे साहित्य चोरीला

पिंपरी – शटर उचकटून चोरटयांनी एका मार्केटिंग ऑफिसमधून 54 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे उघडकीस आली. या प्रकरणी महावीर शांतीसागर ओसवाल (वय-29, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे चिंचवड येथे सन एज मार्केंटिंग नावाने ऑफिस आहे. बुधवारी त्यांचा ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा नेहमीप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास ऑफिस बंद करून घरी गेला.

दरम्यान चोरट्यांनी रात्री ऑफिसचे शटर उचकटून आतील 54 हजार 270 रुपयांचे साहित्य चोरून नेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)