पिंपरी-चिंचवड : ‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळावर पद्मनाभन

सरकार प्रतिनिधी : पुण्याऐवजी पिंपरी पोलीस आयुक्‍तांना संधी

स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयामुळे बदल

राज्य मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली. 15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातून विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्‍तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा बदल तातडीने करावा, असा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने “स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यात पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून 13 जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्‍तांची नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)