…अन्यथा ‘राष्ट्रवादी’ उच्च न्यायालयात जाणार

‘एचसीएमटीआर रिंग रोड’ प्रकरण : विरोधी पक्ष नेत्यांचा आयुक्‍तांना इशारा

फक्‍त तीन दिवसांमध्ये निर्णय?

“घर बचाव’चे शिष्टमंडळ आणि विरोधी पक्ष नेते यांना उत्तर देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, एचसीएमटीआरबाबत फक्‍त तीन दिवसात निर्णय घेतला जाईल. जागा पूर्ण ताब्यात आहे अथवा नाही याबाबत अधिकारी यांचेशी चर्चा केली जाईल. हजारो बाधितांच्या घरांचा प्रश्‍न असल्याकारणाने कायद्याच्या सर्व बाजू तपासून घेतल्या जातील.

पिंपरी – गेल्या दीड वर्षांपासून प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रोड प्रकल्पाचा विरोध सुरूच आहे. सुरुवातीला सर्व पक्षियांनी या आंदोलनात उडी घेतली होती. आता पुन्हा एकदा रिंग रोड प्रकल्पाविरुद्ध राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिकेचे विरोधी पक्ष नेते दत्तात्रय साने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व बेकायदेशीर काम बंद करावे, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामार्फत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्‍तांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत घर बचाव संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार शासनाची अंतिम मंजुरी नसलेल्या एचसीएमटीआर रिंग रेल्वे प्रकल्पा ऐवजी रस्ता बनविण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. 3700 घरे प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. या प्रकल्पाला मंजुरी नसताना कोकणे चौक ते काळेवाडी फाटा ही 1.6 कि.मी ची 28 कोटी रुपयांची निविदा बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आली आहे. ही निविदा काढत असताना पूर्ण जमीनही पालिकेच्या ताब्यात नाही. 1600 मीटर पैकी 600 मीटर जागाही पालिकेच्या ताब्यात नसताना राजकीय दबावापोटी पालिकेने निविदा काढलेली दिसून येत आहे. याबाबत घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला घेऊन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची महापालिकेच्या आयुक्‍त सदनात भेट घेतली, यावेळी त्यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डांगे, राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या श्‍यामला गायकवाड, मयुर कलाटे, अतुल काशीद, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, प्रदीप पवार, निलचंद्र निकम, हर्षल काटे, समन्वयक गौसिया शेख, उमाकांत सोनवणे, गोपाळ बिरारी, माणिक सुरसे, प्रितम पवार, सचिन पोखरकर, धनाजी येवले, नंदकुमार नायकोडी, पोपट पवार, प्रमोद विभूते, मंगल नायकोडी, पार्वती पोखरकर, सुप्रिया शेलार, के डी पाटील, बा भि काळे, मोहमुद्दीन शेख, विशाल माने, अमोल कानु, अमित डांगे उपस्थित होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डांगे म्हणाल्या, 2012 नंतर शहरात लाखो अनधिकृत बांधकामे उभी करण्यासाठी बीट मार्शल आणि क्षेत्रीय अधिकारी हेच कारणीभूत ठरतात अश्‍या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. ह्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. त्यानंतर मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात जावेच लागेल, असा इशाराही दिला आहे.
समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले, पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी अभियंत्यांना रूट व रस्ता त्याचप्रमाणे टर्मिनल व स्टेशन यातील फरक अद्याप समजला नाही.

मंजूर नसलेल्या एचसीएमटीआर बाबत त्यांनी आयुक्‍त व लोकप्रतिनिधी यांना अंधारात ठेवून चुकीची माहिती दिली. त्यामुळे एचसीएमटीआरच्या नावाने ठराव संमत होऊन नियमबाह्य निविदाही निघाली. यामुळे काळेवाडी फाटा ते कोकणे चौक दरम्यानच्या घरांवर अमानुषपणे हातोडा पडला. व अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. कारवाई झालेल्या सर्व रहिवाशी घरांची पुर्नबांधणी आहे त्या जागेवर पालिकेने स्वखर्चाने करून द्यावी. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नगरसेविका मंगला कदम, डॉ.जयश्री घोडेकर, नगरसेवक राजू मिसाळ, मच्छिंद्र तापकीर, मयुर कलाटे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते कक्षात रिंग रोड बधितांची बैठक घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)