पिंपरी – बांधकाम साईटवरील पॉलीकॅब वायर, लि-ग्रॅंण्ड कंपनीचे एमसीबी, आरसीसी पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना हिंजवडी येथील विकास जावडेकर इकोसेल्टर्सच्या साईटवर 10 मे रोजी उघडकीस आली.
याप्रकरणी नितीन भाऊराव तरंगे (वय- 40) यांनी हिंजवडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पत्र्यच्या शेडमधून हे साहित्य चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.