पिंपरी – रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तिघांजणांनी जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील 12 हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील 2 हजार रुपये रोख असा 14 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.13) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावर घडली.
याप्रकरणी भूषण सुनील महाजन (वय 20, रा. भोसरी एमआयडीसी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भूषण हा भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावरुन शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराकडे चालला होता. यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या तिघा चोरट्यांनी त्याचा रस्ता अडविला व जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील 14 हजारांचा ऐवज लंपास केला.