पिंपरी – चौदा वर्षीय मुलाला अमिष दाखवून एका अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार आळंदी येथील दुराफे विद्यालयाच्या गेटसमोर घडला. या प्रकरणी तीस वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील चाकणकर धर्मशाळेतील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले आहे. या मुलाला फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु असून आळंदी पोलीस तपास करत आहेत.