पिंपरी – पिंपरी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. ही घटना दि. 7 जुलै रोजी सांयकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपरी येथील मिलिंदनगर येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी हे करीत आहेत