बांधकाम साईटवर चोरी करणारे गजाआड

संग्रहित छायाचित्र

पिंपरी – बांधकाम साईटडवर ठेवलेले स्टील चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना हिंजवडी फेज 3 येथील आर. एस प्रोजेक्‍ट साईटवर रविवार दि. 7 जुलै रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्‍टर विष्णू शेटेप्पा शिवशरण (वय-40) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन, ज्ञानेश्‍वर माणिक भेंडेकर (वय-20, रा. गंगारामवाडी ता. मुळशी) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे आर.एस प्रोजेक्‍ट बांधकाम साईट आहे. या साईटवर बांधकामासाठी स्टील आणून ठेवले आहे. दि. 7 जुलै रोजी पहाटे आरोपी ज्ञानेश्‍वर व त्याचे दोन साथीदार या साईटवरील स्टिल चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)